AmravatiLatest NewsSocial News

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

अमरावती – क्रांतीकारी समाजसेविका, भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्रात मोठ¬ा उत्साहात साजरी करण्यात आली.  यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले.  जयंती कार्यक्रमाला आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे, ज्ञानरुाोत केंद्राच्या संचालक डॉ. वैशाली गुडधे, प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ.एच.पी. नंदुरकर, गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ.सौ. वैशाली धनविजय, उपयोजित परमाणू विद्युत विभागप्रमुख डॉ.सौ. सुजाता काळे, डॉ. जागृती बारब्दे, उपकुलसचिव सौ. मिनल मालधुरे, उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, डॉ. भगवान फाळके, सहा. ग्रंथपाल श्री विशाल बापते तसेच विद्यापीठातील महिला व पुरुष शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.  संचालन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती डॉ. भगवान फाळके यांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button