AmravatiLatest NewsSports
राज्यस्तरीय आदिवासी आश्रमशाळा क्रीडा स्पर्धांचे आयोजन ५ ते ७ जानेवारी दरम्यान

अमरावती, ३० डिसेंबर २०२५:
सन २०२५-२६ या वर्षात आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा अपर आयुक्त आदिवासी विकास, अमरावती विभागाच्या देखरेखीखाली होणार आहे.
क्रीडा स्पर्धा ५, ६ आणि ७ जानेवारी २०२६ या तीन दिवसांमध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या सुत्रसंचालनासाठी कार्यालयाच्या स्तरावर विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून, याबाबतची माहिती अपर आयुक्त आदिवासी विकास, जितेंद्र चौधरी यांनी दिली आहे.



