AmravatiLatest NewsMaharashtra Politicspolitics

दीपक साहू सम्राट यांना जनतेचा मोठा पाठिंबा असंख्य समर्थकांसह कार्यकर्ता मेळाव्यात भव्य प्रवेश

अमरावती । स्वराज भाकरे

भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा दीपक साहू सम्राट यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. या मेळाव्याला पक्षाचे मान्यवर नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते, मित्रबंधू तसेच मोठ्या संख्येने मातृशक्तीने उपस्थिती नोंदवून कार्यक्रमाला भव्य स्वरूप दिले.

या मेळाव्यात भाजपाच्या संघटनात्मक मजबुतीवर भर देण्यात आला. उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला असून, आगामी काळात पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाला छक्कीलाल घुवारावाले, अनिल भोजराज साहू, दिन्नू महाराज तिवारी, किसनलाल डब्बावाले, गिरधारीलाल माते, देवीदास साहू, बाबासेठ, प्रेमचंद बिजोरे, महेशजी किल्लेकर, भूपेंद्रसिंग ठाकुर यांच्यासह अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच रवि सम्राट, कृष्णप्रकाश केशरवानी, सुनील भोजराज साहू, अशोक गुप्ता, मोहन चव्हाण, मंटूलाल साहू, संतोष गुप्ता (आर.डी.), जतिन यादव, निलेश सम्राट, संजय मास्टर, विनोद अंबादास, विशाल श्रीनाथ, मोनू तिवारी, शैलेश बिजोरे, शेखर गुप्ता यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

युवक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहात उपस्थित राहून मेळावा यशस्वी केला. सर्व मान्यवरांनी पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आणि संघटना मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला.

एकूणच या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपाच्या संघटनात्मक ताकदीचे दर्शन घडले असून, पक्षात नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button