Latest NewsMaharashtrapolitics
महायुती 200 पार, भाजप सर्वात मोठा पक्ष

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांना सुरुवात झाली असून, या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. प्रत्येक महत्त्वाचा अपडेट नागरिकांना येथे पाहायला मिळणार आहे.
प्राथमिक निकालांनुसार महायुतीने 200 जागांचा टप्पा पार केला असून, राज्यभरात महायुतीचा बोलबाला दिसून येत आहे. नगरपालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीची भक्कम आघाडी स्पष्ट होत आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, भाजपा 123 जागांवर आघाडीवर आहे. इतर घटक पक्षांच्या तुलनेत भाजपची आघाडी मोठी असून, अनेक ठिकाणी विजयी घोडदौड सुरू आहे.
मतमोजणीची प्रक्रिया अद्याप सुरू असून, पुढील काही तासांत अंतिम चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. बदलत्या आकडेवारीसह निवडणूक निकालांचे लाईव्ह अपडेट्स सातत्याने देण्यात येणार आहेत.



