Latest NewsYavatmal

माजी मंत्री नानाभाऊ एम्बडवार यांचे कोंघारा येथे वृद्धापकाळने निधन,

पांढरकवडा (यवतमाळ) | महाराष्ट्राचे माजी वनमंत्री नानाभाऊ एम्बडवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी पांढरकवडा तालुक्यातील कोंघारा येथील त्यांच्या राहत्या घरी आज (शनिवार) अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र आणि विशेषतः यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.


सामाजिक कार्याची वेगळी ओळख

नानाभाऊ एम्बडवार यांनी महाराष्ट्राचे वनमंत्री म्हणून काम पाहिले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी समाज हिताचे विविध निर्णय घेऊन एक वेगळी प्रतिमा तयार केली होती. त्यांच्या कामाची दखल घेऊन अनेक सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


भाऊ धोटे यांचे निकटवर्तीय

दिवंगत नानाभाऊ एम्बडवार हे विदर्भाचे माजी खासदार दिवंगत भाऊ जांबुवंतराव धोटे यांचे अत्यंत निकटवर्तीय मित्र म्हणून ओळखले जात होते. या दोघांनी मिळून नंतरच्या काळात अनेक सामाजिक आंदोलने केली होती, ज्यामुळे विदर्भाच्या राजकारणात त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण होते.


उद्या कोंघारा येथे अंत्यसंस्कार

माजी मंत्री एम्बडवार यांच्या पार्थिवावर उद्या रविवार, कोंघारा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते अंत्यसंस्काराला उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप देण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button