अमरावती शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी जाहीर

अमरावती: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित De-nova Electoral Roll तयार करण्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी बुधवार, 3 डिसेंबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
अपर आयुक्त संजय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही यादी विभागीय, जिल्हा, उपविभागीय आणि तहसील कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. मतदार यादीतील दावे आणि हरकतीसाठी 3 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत अर्ज करता येईल.
प्राप्त झालेले सर्व दावे–हरकतींचा निपटारा 5 जानेवारी 2026 रोजी केला जाईल आणि त्याच दिवशी पुरवणी यादीची छपाई करण्यात येईल. अंतिम मतदार यादी 12 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे.
अद्याप नाव नोंदणी करायची असल्यास, संबंधित पात्र शिक्षकांनी लवकरात लवकर अर्ज करावा, असेही अधिकारीांनी सुचवले आहे.



