Crime NewsLatest NewsWashim

मालेगाव शहरात अवैद्य सावकारीचा वाढता धंदा; गोरगरीब व्यावसायिक त्रस्त

मालेगाव / वाशिम: मालेगाव शहरात अवैद्य सावकारी व्यवसाय जोर पकडत असून, विशेषत: “खंटी” पद्धतीने अनेक गोरगरीब आणि लघु व्यावसायिकांना या व्यवसायाच्या जाळ्यात अडकवले जात आहे. माहिती अशी की, या पद्धतीत मासिक 30 ते 45 रुपये प्रति शेकडा व्याज दराने पैसे उकळवले जात आहेत.

संबंधित विभागाची कारवाई न केल्यामुळे ही सावकारी दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागातही अवैध सावकारीचे कर्ज मोठ्या प्रमाणात पसरले आहे, ज्यामुळे अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय बंद करावा लागत आहे, तर काहीजण आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत.

विशेष उल्लेखनीय घटना अशी की, मालेगाव शहरातील एका वीज वितरण कंपनीच्या वायरमन कर्मचाऱ्याने आठ हजाराचे कर्ज अठ लाख रुपये व्याजासहित दिल्याचे समोर आले आहे. हा कर्मचारी शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाचा नातेवाईक असून, अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या तो दारोदर फिरत असून, सावकारांमुळे मानसिक त्रस्त आहे.

सावकारी व्यवसायावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची बेपरवाही असून, प्रत्यक्ष कारवाई न झाल्यामुळे अवैध सावकारांना अधिक बळ मिळत आहे. स्थानिक नागरिक आणि सावकारग्रस्त पीडितांनी या अवैद्य सावकारीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button