AmravaticitynewsCrime NewsLatest News

राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील हत्येचा प्रकरण उघड; आरोपी ताब्यात

राजापेठ, २ डिसेंबर २०२५ — राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झालेल्या हत्येच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी ताब्यात घेतला आहे.

घटना रविवार, ३० नोव्हेंबर रोजी संताजी नगर गुरुकृपा कॉलोनीतील राहत्या घरात घडली होती, जिथे निलिमा संजय खरपडे या महिलेचा मृतदेह आढळला होता. हत्येचा गुन्हा राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला होता.

मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी अर्जुन नगर निवासी नितीन इंगोले याला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपीला मृत महिला मानसिक त्रास देत ब्लॅकमेल करत होती, यामुळे हल्ला घडवून आणल्याचा संशय आहे.

तथापि, पोलिसांचा तपास अद्याप सुरू असून, अधिक तपशील आणि आरोपीच्या खुनाची नेमकी कारणे तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button