अमरावतीत दहशतवाद विरोधी मॉकड्रिलचे प्रभावी प्रात्यक्षिक; जलद प्रतिसाद पथकाने दोन अतिरेक्यांना ताब्यात घेतले

अमरावतीत गुरुवारी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे दहशतवाद विरोधी मॉकड्रिल पार पडली. आगामी निवडणुका, व्हीव्हीआयपी सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
जलद प्रतिसाद पथकाच्या कमांडोंनी अत्यंत कौशल्याने दोन अतिरेक्यांना ताब्यात घेतले आणि ओलीस ठेवलेल्या तीन व्हीव्हीआयपींची सुरक्षित सुटका केली. ड्रिलमध्ये डॉग स्कॉड, बीडीडीएसचे पोलीस निरीक्षक रवि जेधे, एटीबीचे पो उपनिरीक्षक सोनोने, स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी पो नि रोशन सिरसाट आणि त्यांचे पथक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
विश्राम भवनचे प्रभारी श्रीकृष्ण गोमकाळे आणि त्यांचा स्टाफही संपूर्ण तयारीने सहभागी झाले. पोलीस आयुक्त अरविंद चावरीया, परिमंडळाचे डीसीपी, मुख्यालय आणि एसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॉकड्रिल यशस्वीरीत्या पार पडली.
पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “अमरावती पोलीस दलाची क्षमता, तयारी आणि समन्वय किती सक्षम आहे, हे याच मॉकड्रिलमधून स्पष्ट दिसून आले.”



