India NewsLatest News
२ कोटींपेक्षा अधिक आधार क्रमांक निष्क्रिय — UIDAI ची मोठी कारवाई

देशभरातील विविध शासकीय विभागांकडून प्राप्त माहितीच्या आधारे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) मृत व्यक्तींचे २ कोटीहून अधिक आधार क्रमांक निष्क्रिय केले असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
UIDAI ला मृत व्यक्तींबाबतची माहिती नोंदणी महानियंत्रक (Registrar General of India – RGI), सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS), राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम तसेच इतर शासकीय यंत्रणांकडून प्राप्त झाली.
या मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या ‘क्लीन-अप ड्राइव्ह’द्वारे मृत नागरिकांचे आधार क्रमांक वापरात राहू नयेत, गैरवापर टाळावा आणि विविध लाभ योजनांमध्ये पारदर्शकता राखावी हा उद्देश असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले



