Amaravti GraminAmravatiamravatinewsCity CrimecitynewsCrime NewsLatest News

अमरावतीत भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांना धमकीचा फोन; युवक ताब्यात

अमरावतीत भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन मिळाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. 23 नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने फोनवरून शिवीगाळ करत खासदारांना धमक्या दिल्या.

घटनेनंतर डॉ. बोंडे यांनी तत्काळ राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, आणि प्रकरणाची गंभीरता ओळखून पोलिसांनी त्वरित चौकशी सुरू केली. पोलिसांनी वरुड शहरातून एका युवकाला ताब्यात घेतले असून, सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

सदर प्रकरणात, आरोपीने फोनवर ‘तक्रार काम का नाही केले?’ असा सवाल करत धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे, यापूर्वी हैदराबादहूनही अशाच प्रकारचे धमकीचे कॉल डॉ. बोंडे यांना आले होते.

राजापेठ पोलिस हे प्रकरण गंभीर मानून, आरोपीच्या तपासासह इतर संभाव्य संबंधी घटकांचा शोध घेत आहेत.

अमरावतीतील राजकीय व पोलीस वर्तुळात या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button