नागपुरात वाहन आणि मोबाईल चोरी प्रकरणाचा उलगडा; गुन्हेशाखा युनिट 01 ची धडाकेबाज कारवाई

शहरात वाहन आणि मोबाईल चोरीच्या घटना वाढत असताना, गुन्हेशाखा युनिट क्रमांक 01 ने प्रभावी कारवाई करून टीव्हीएस ज्युपिटर दोनचाकी आणि एकूण सहा मोबाईल चोरी प्रकरणाचा उलगडा केला आहे. या कारवाईत सायमन उर्फ शेट्टी अँथोनी फ्रान्सिस याला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदारही मोबाईल चोरीत सामील असल्याची माहिती समोर आली आहे. सोनगाव आणि बेलतरोडी पोलीस ठाण्यांमधील दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा उलगडा या तपासातून झाला आहे.
कशी झाली कारवाई?
१२ ते १३ नोव्हेंबरच्या दरम्यान सोमलवाड्यातील सृष्टी अपार्टमेंटसमोरून ३०,000 रुपये किमतीची टीव्हीएस ज्युपिटर स्पूटर चोरीला गेली होती. राहुल बालेकर यांच्या तक्रारीवरून सोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हेशाखा युनिट 01 ने अजनी परिसरातून सायमन फ्रान्सिस याला ताब्यात घेतले, ज्याने चौकशीत वाहन चोरीची कबुली दिली.
याच चौकशीत अनिकेत मेश्राम या साथीदारासह अनेक मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याचेही उघड झाले. पोलिसांनी आरोपीकडून
- चोरीची Jupiter स्कूटर
- तीन चोरीचे मोबाईल
- आणखी तीन मोबाईल
असे एकूण ७३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीस पुढील कारवाईसाठी सोनगाव पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले असून तपास सुरू आहे.



