‘नशा मुक्त भारत खुशाल भारत’ अभियानांतर्गत दिव्यांग विद्यार्थी-कर्मचाऱ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ!

जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन
अमरावती : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘नशा मुक्त भारत खुशाल भारत’ अभियानाची अंमलबजावणी जिल्हा समाज कल्याण व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.
जिल्हा समाज कल्याण व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मा. श्री. ज्ञानबा पुंड यांच्या प्रमुख नेतृत्वात आज डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय व आश्रित अंध कर्मशाळा, अमरावती येथे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
व्यसनमुक्तीचा संकल्प
या कार्यक्रमात व्यसनामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम आणि व्यसनमुक्तीचे महत्त्व यावर विस्तृत माहिती देण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व दिव्यांग विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतली. या शपथेच्या माध्यमातून व्यसनापासून दूर राहण्याचा आणि इतरांनाही व्यसनमुक्ती करिता प्रेरित करून व्यसनमुक्त भारत घडवण्याचा दृढ संकल्प सर्वांनी केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसची मजबूत घोडदौड – जिल्हाध्यक्षांचा विश्वास
या कार्यक्रमाला आश्रित अंध कर्मशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक पंकज मुदगल, डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक इंगोले, तसेच समाज कल्याण विभागाचे श्री. फरीद शहा, श्री. भरत राऊत, श्रीमती किरण तायडे, श्री. ओमप्रकाश नेमाडे, श्रीमती मेनका तिवारी, श्रीमती गंगा गायकवाड, श्री. रविंद्र महालकर , श्री. शिशिरकुमार महापात्रा, श्री. आशिष चुनडे, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



