BadneraLatest NewsMaharashtra

बडनेरा रेल्वे स्थानकावर गायी-बैलांचा मोकाट वावर

बडनेरा रेल्वे स्थानकावर अलीकडे मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तिकीट बुकिंग ऑफिस, प्रतीक्षालय आणि प्लॅटफॉर्मवर गायी, बैल, वासरे फिरताना दिसत आहेत. काही जनावरे तर थेट तिकीट काउंटरपर्यंत पोहोचत असून, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. प्रवासी बाजूला सरकतात, तर काही जण या प्रकाराचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या दृश्यामुळे रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अंमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकाचा विकास सुरू आहे, पण स्वच्छता आणि सुरक्षा या मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
शेतांमधून किंवा आसपासच्या भागातून जनावरे अन्नाच्या शोधात स्थानक परिसरात प्रवेश करतात. कधी कधी ती थेट रेल्वे ट्रॅकवरून जाताना दिसतात, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे. सुरक्षारक्षकांची संख्या वाढवावी, स्थानकाभोवती कुंपण उभारावं आणि जनावरांना प्रवेश होऊ नये यासाठी अडथळे लावावेत — अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
तथापि, रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी, बडनेरा रेल्वे स्थानकावर “तिकीट बुकिंगपासून ट्रॅकपर्यंत जनावरांची वावरमुक्त सफर सुरूच” अशी परिस्थिती कायम आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button