AmravatiLatest NewsMaharashtra
हा लढा आमचाच आहे, कुणीही हस्तक्षेप करू नये – सोनाबाई
४ नोव्हेंबर रोजी राजापेठ बसस्थानकाजवळ दोन तृतीयपंथी गट ज्यामध्ये आम्रपाली आणि सोनाबाई गट असे होते, यांच्यात मोठा राडा झाला होता. या घटनेत मिरची पावडर फेकणे, तसेच तलवारीने वार करण्याचे आरोप दोन्ही गटांनी एकमेकांवर केले. या प्रकरणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि शेवटी हा वाद ७ नोव्हेंबर रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचला. सोनाबाई गटाने सिटी न्यूजच्या माध्यमातून अमरावतीकरांना थेट आवाहन केलं. हा लढा फक्त तृतीयपंथीयांचा आहे. यात कोणतीही संघटना, राजकीय पक्ष किंवा सामान्य नागरिक सहभागी होऊ नये. अमरावतीकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शहरात शांतता राखावी. सोनाबाई यांच्या या आवाहनानंतर या वादाला आता सामाजिक सौहार्द राखत मार्ग काढला जाईल अशी अपेक्षा आहे.



