Latest NewsMaharashtra

नांदेड जिल्हाधिकारी यांनी दिली निवडणूक तयारीची माहिती

राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्यातील निवडणूक तयारी, मतदानाची तारखा, संवेदनशील बूथ तसेच अतिवृष्टी मदतीबाबत सविस्तर माहिती दिली.
जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्यातील बारा नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतसाठी निवडणुका जाहीर झाल्या असून, 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकृती होणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी चिन्हवाटप, 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. कर्डिले यांनी सांगितले की, निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. महसूल व पोलीस विभागासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून, सर्व ईव्हीएम मशिन्स जिल्ह्यात पोहोचल्या आहेत. मतदारांना कुठल्याही प्रलोभनाशिवाय व दबावाशिवाय मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. अतिवृष्टीच्या मदतीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, निवडणूक आचारसंहितेमुळे मदत वाटपाला कोणताही अडथळा येणार नाही. तसेच हदगाव येथील तहसीलदारांना सरपंच आरक्षण प्रक्रियेत झालेल्या त्रुटीमुळे कार्यमुक्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button