Latest NewsMaharashtra

सट्टा-पट्टी जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, १८ आरोपी अटकेत

दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एन.आय.टी गार्डन, दर्शन कॉलनी परिसरात काही इसम सट्टा-पट्टीवर जुगार खेळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ नमूद ठिकाणी धाड टाकली. धाडीदरम्यान अक्षय प्रकाश शेंडे (३४) आणि जावेद शेख हकीम शेख (४०) यांच्यासह एकूण १८ आरोपी सट्टा-पट्टीवर पैशांची बाजी लावताना पकडले गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख ३२ हजार ५९० रुपये, ११ मोबाईल फोन, ३ दुचाकी वाहने आणि अन्य साहित्य असा एकूण ३ लाख ४२ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात आरोपींविरुद्ध कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आणि कारवाईसाठी सर्व आरोपींना नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) मा. राहुल माकणीकर आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. गजानन गुल्हाने आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button