Uncategorized

शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत समीक्षा बैठक

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे मोठे आयोजन! राम मेघे महाविद्यालय येथे आयोजित या पाच जिल्ह्यांच्या समीक्षा बैठकीत यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांचे प्रमुख भाजप नेते सहभागी झाले.
या बैठकीत उपस्थित होते: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा, अमरावती भाजपा जिल्हा शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, तसेच भाजपाचे प्रामुख्याने पदाधिकारी.
सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्याची बैठक सुरु झाली, जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित नेत्यांना संबोधित करत निवडणूक धोरण, उमेदवार निवडीची प्रक्रिया आणि शिक्षक मतदार संघाच्या महत्वावर भर दिला. मागील 2020 मध्ये अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ. नितीन धांडे यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र यंदा निवडणुकीसाठी उमेदवार स्पर्धा वाढल्याचे दिसून येत आहे.
अद्याप चर्चेत असलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये शेखर भोयर, सौ संगीता सचिद्र शिंदे यांचा समावेश आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी पाचही जिल्ह्यातून योग्य उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू असून, यामध्ये भाजप नेत्यांनी एकमत साधण्यावर भर दिला.
मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत उमेदवार निवडीच्या प्रत्येक पैलूवर चर्चा करत, संघटनेची रणनीती आणि शिक्षक मतदार संघातील जनसंपर्क वाढवण्यावर विशेष भर दिला.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button