Latest NewsMaharashtra

CJI भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा मेहकर वकील संघाकडून निषेध व्यक्त

मेहकर : देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे वकिल संघटना आक्रमक झाली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकरमध्ये वकिलांनी आपले दैनंदिन कामकाज ठप्प ठेवले आणि वकील संघाच्या सभागृहात निषेध सभा बोलावली. या सभेत वकिलांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. मेहकर वकील संघाच्या अध्यक्ष ॲड. अनिल अडेलकर आणि सचिव ॲड. सुबोध जाधव यांसह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते. वकील संघाने तहसील कार्यालयमार्फत राज्यपालांना निवेदन देऊन न्यायाधीशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. वकील संघाने स्पष्ट केले की, ‘ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि न्यायव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.’ संपूर्ण महाराष्ट्रात वकिल संघटना या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. या घटनेवर अनेक राजकीय पक्षांनीही आपला निषेध नोंदवला आहे. राज्यातील वकिल संघटना एकमताने सरन्यायाधीशांना पाठिंबा देत आहेत आणि अशा प्रकारच्या हल्ल्यांना सतत रोखण्यासाठी मागणी केली आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button