महाराष्ट्र राज्यातील एकमेव परंपरा गृपव्दारे आयोजित रासगरब्याच्या वतीने शेतकऱ्यांना देणार मदत

महसुल मंत्री व अमरावती जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महाआरती – परंपरा गृपव्दारे आयोजित अंबा महाकुंभ गरब्यामध्ये परंपरा गृपकडुन शेतकऱ्यांना आर्थीक मदत देण्याची घोषणा
आ.रवि राणा, आ.प्रविण तायडे, भाजपा जिल्हाअध्यक्ष रविराज देशमुख, भाजपा शहर अध्यक्ष नितीन धांडे, समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांची प्रमुख उपस्थिती
अमरावती – संपूर्ण अमरावती शहरामध्ये नवरात्रीच्या महापर्वावर रासगरब्याची धुम असून नवरात्रीच्या पाचव्या दिवशी परंपरा गृपव्दारा आयोजित अंबा महाकुंभ रासगरब्यामध्ये गुजराती वेशभुषेची थिम ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे अमरावती जिल्हयाच्या दौऱ्यावर असलेले अमरावती जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अंबा महाकुंभ रासगरब्याला सदिच्छा भेट दिली. यावेळी मंडळाच्यावतीने आ.रवि राणा यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.
तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महाआरती सुध्दा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्यातील एकमेव रासगरबा म्हणुन परंपरा गृपव्दारे शेतकऱ्यांना आर्थीक मदत करणार असल्याची घोषणा परंपरा गृपच्या सदस्यानी बावनकुळे व आ.रवि राणा यांच्या उपस्थितीत केली.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुध्दा परंपरा गृपचे कौतुक केले व असे अभिनव उपक्रम प्रत्येक रासगरब्यामध्ये राबविण्यासंदर्भात असे आवाहन केले.
यावेळी सुनिल राणा, कमलकिशोर मालानी, पवनकुमार जाजोदिया, नितीन अनासाने, राहुल बजाज, मनोज चांदवानी, किशोर पिवाल, दिनेश सेठीया, दिनेश अग्रवाल, विनय तन्ना, अंकुश गोयनका, संदिप गुल्हाने, प्रविण सावळे, वैभव बजाज, नितीन बोरेकर, विनोद जायलवाल, विनोद गुहे, गजानन रेवाळकर, तुषार दुधे, निखिल आकोटकर, महेश मुलचंदानी, विजय मोटवानी, मिथीलेश तिवारी, , धिरज हिरानी, महेंद्र लायत, सागर मतानी, विश्वनाथ अरोरा, राजेश कटारीया, अजय बोबडे, मनोज डहाके, राकेश अहेजा, अंजय सोजरानी, हर्षल रेवणे, अविनाश काळे, करण आश्रा, विनय राजानी, अँड.रोहन शर्मा,सुरेश पडोळे, राजा बाखडे, शंकर भगरानी, अनुपमा राणा, स्नेहल गुल्हाने, नितु गोयनका, श्वेता तन्ना, पुजा बोरकर,मयुरी सेठीया, कविता मंत्री, संगीता सावळे, शितल पिवाल, वर्षा लुल्ला, प्रित संतवानी, रेणु खत्री, रीया नांदवानी, सोनल नांदवानी, पिंकी चांदवानी, रोहीनी अनासाने, प्रिती रेवणे हे उपस्थित होते.



