AmravatiLatest NewsMaharashtra Politics

स्वच्छ वायू सर्वेक्षणात अमरावती मनपा देशात प्रथम – आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांचा सन्मान

आ. रवी राणा यांचा अभिनंदन प्रस्ताव, पालकमंत्र्यांकडून सत्कार, शहरांत मूलभूत सुविधा पुरविणे, स्वच्छता, पारदर्शक प्रशासन देण्यासाठी आयुक्त सकाळी ६:०० वा. पासून रस्त्यावर. गौरवशाली कामगिरी. मनपातील  भष्टाचार बंद.

दि. २७ सप्टेंबर २०२५ : अमरावती महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने आयोजित “स्वच्छ वायू” सर्वेक्षण – २०२५ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये अमरावती शहराने देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून, ही एक अत्यंत गौरवास्पद व उल्लेखनीय कामगिरी आहे.

सदर यशाबद्दल माननीय ना. भूपेंद्रजी यादव, केंद्रीय ग्रामविकास मंत्री तसेच इतर मान्यवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शुभहस्ते सौ. सौम्या शर्मा चांडक, आयुक्त तथा प्रशासक, अमरावती महानगरपालिका यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व ₹७५ लाखांचे पारितोषिक नवी दिल्ली येथे आयोजित औपचारिक समारंभात प्रदान करण्यात आले.

सौ. सौम्या शर्मा चांडक यांनी महानगरपालिकेत कार्यभार स्वीकारल्यानंतर शहरात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन तसेच नागरी सुविधा सुधारणा विषयक अनेक उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीला नागरिक तसेच मनपा कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. त्यांच्या दृढ नेतृत्वगुणांमुळे व नियोजनबद्ध कार्यक्षमतेमुळे अमरावती शहराला राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली आहे.

या यशस्वी कामगिरीबाबत आज पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत सभेमध्ये आ. रवी राणा यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला, जो  सर्वानुमते मान्य केला.

यानंतर पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सौ. सौम्या शर्मा चांडक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पालकमंत्र्यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा व यशस्वी वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.

या प्रसंगी राज्यसभा सदस्य डॉ.अनिल बोंडे,आ. संजय खोडके, आ. सुलभा खोडके, आ. राजेश वानखडे, आ. प्रवीण तायडे, जिल्हाधिकारी डॉ. आशिष येरेकर, तसेच भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, चेतन पवार, सुनील काळे, अजय सारसकर, प्रणित सोनी, सचिन रासने.सुनील खराटे, ऋषिकेश देशमुख,व युवा स्वाभिमान पक्षाचे शहर प्रमुख संजय हिंगासपूरे, माजी नगर सेवक सुमतीताई ढोके, आशिष गावंडे, विनोद जायलवाल, सचिन भेंडे, उमेश ढोणे, हर्षल रेवने, दिनेश टेकाम, आदि पदाधिकारी व मनपा अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button