AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठात ‘इंटरनॅश्नलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन : द ग्लोबल फ्युचर्स’ विषयावर उद्या राष्ट्रीय कार्यशाळा

संगणकशास्त्र विभाग व यू.जी.सी. मालवीय मिशन टिचर ट्रेनिंग सेंटरचा संयुक्त उपक्रम

अमरावती – (दि. 25.09.2025) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील संगणकशास्त्र विभाग आणि यू.जी.सी. मालवीय मिशन टिचर ट्रेनिंग सेंटरच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानव्दारा ‘इंटरनॅश्नलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन : द ग्लोबल फ्युचर्स’ या विषयावर शुक्रवार दि. 26 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11.00 वा. राष्ट्रीय कार्यशाळेचे विद्यापीठ परिसरातील दृकश्राव्य सभागृह (ए.व्ही.थिएटर) येथे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
                तरी सदर कार्यशाळेचा सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मोहम्मद अतिक यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता डॉ. मोहम्मद अतिक यांचेशी संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button