नाशिकमध्ये ठाकरेसेना-मनसेचा ड्रग्ज, गुन्हेगारी आणि खड्ड्यांविरोधात जनआक्रोश मोर्चा

नाशिक : शहरातील वाढती गुन्हेगारी, एमडी ड्रग्जची खुलेआम विक्री आणि रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात आज नाशिकमध्ये ठाकरेसेना आणि मनसेचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे उपस्थित होते. हजारो नागरिकांनी या मोर्चात सहभाग नोंदवला.
मोर्च्यादरम्यान, बहुचर्चित राहुल धोत्रे प्रकरणाचा निषेधही व्यक्त करण्यात आला. आंदोलकांनी न्यायासाठी बॅनर घेऊन रस्त्यावर धडक मोर्चा काढला. या प्रसंगी नेत्यांनी शहरातील गुन्हेगारी आणि ड्रग्जच्या वाढत्या प्रकरणांबाबत प्रशासनावर लक्ष देण्याची मागणी केली.
संजय राऊत, बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील समस्या दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आवाहन केले. या मोर्च्यामध्ये नागरिकांनी एकत्र येऊन त्यांच्या समस्या ऐकून घेण्याची मागणी केली.



