AmravatiLatest NewsMaharashtra

अमरावतीत आज विदर्भाच्या राजाचे विसर्जन, राजकमल चौकात सज्ज महाआरती

अमरावती- मरावतीत आज गणेशभक्तांसाठी मोठा सोहळा रंगणार आहे. शहरातील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचा “विदर्भाचा राजा” गणपती बाप्पा विसर्जनासाठी सज्ज झाला असून दुपारी २ वाजता भव्य मिरवणूक निघणार आहे.

या मिरवणुकीत ढोल-ताश्यांचा गजर, कलात्मक देखावे, विविध झाक्या, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग असणार आहे. मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे राजकमल चौकातील महाआरती, जी रात्री ७.३० वाजता होणार असून यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

पश्चिम विदर्भातील असंख्य भक्त विशेषतः या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी अमरावतीत दाखल झाले आहेत. शहरात सध्या उत्साह, आनंद आणि भक्तिरसाचे वातावरण असून, “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात आज अमरावतीतील वातावरण दुमदुमणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button