Crime NewsLatest News
हिंदू समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष कमल चौहान यांची गोळीबारात हत्या

मुरादाबाद : हिंदू समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष कमल चौहान यांची मुरादाबादमधील करूलाजवळ गोळीबार करून हत्या करण्यात आली. चौहान घरी परतत असताना दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळून गेले.
जखमी चौहान तातडीने रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी सनी उर्फ सोनू दिवाकरचा शोध सुरू केला असून, तीन पोलीस पथके तपासासाठी तैनात करण्यात आली आहेत.
चौहानच्या कुटुंबाने भारतीय जनता पक्षाशी संबंधित काही व्यक्तींवर हत्येचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, आरोपींना लवकरच ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



