AmravatiLatest NewsLocal News

कचरा टाकण्यास प्रतिबंध – रामपुरी कॅम्प प्रभाग क्रमांक ३ मधील भिंतीवर जनजागृती पेंटिंग

अमरावती – अमरावती महानगरपालिका उत्तर झोन क्र. १ अंतर्गत येणाऱ्या रामपुरी कॅम्प प्रभाग क्रमांक ३, नवसारी परिसरात स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नवसारी स्मशानभूमी लगत, नवसारी रोडवरील पावर हाउसजवळील भिंतीवर, संबंधित परिसरात कचरा टाकू नये यासाठी जनजागृतीपर पेंटिंग करण्यात आले आहे.

या पेंटिंगद्वारे नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास महानगरपालिकेच्या नियमांनुसार कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अमरावती महानगरपालिका सातत्याने शहराच्या स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवत असून, या भागात होणाऱ्या बेकायदेशीर कचरा टाकण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button