महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केली फिशरीज हबची पाहणी

अमरावती : महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज फिशरीज हबची पाहणी केली. पाहणी दरम्यान शहर अभियंता रविंद्र पवार, नोडल ऑफीसर तथा पशुशल्य चिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, अग्निशमन प्रमुख लक्ष्मण पावडे, अभियंता राजेश आगरकर, सुधीर गोटे तसेच उपअभियंता स्वप्नील जसवंते, शरद तिनखेडे आणि मनपाचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.
अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये फिशरीज हब ची उभारणी करुन निलक्रांती योजने अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे कोळी लोक, मत्स्य उत्पादक, अमरावती महानगरपालिका क्षेत्रालगत विक्रेते तथा ग्राहक यांना फायदा होणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांनी निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. ताज्या, थंड आणि गोठलेल्या आणि मुल्यवर्धीत माशांच्या खाद्य उत्पादनांचे व्यापार, गोदाम, प्रक्रिया, वितरण आणि निर्यात यासाठी अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये मत्स्य व्यवसाय हब (फिश फूड हब) मध्ये रुपांतरीत होणार आहे.
महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी यावेळी अधिका-यांना सांगितले की, फिशरीज हब तयार करुन सर्व आवश्यक सुविधा देवून सुविधा पुरविण्यासाठी कार्य करावे. ग्राहकांना दर्जेदार मासे उपलब्धता सुनिश्चित करावी. गुणवत्ता नियंत्रण उपकरणे आणि आवश्यकते सह फिशरीज हब प्रदान करावा. स्थानिक फिशर किंवा मासेंच्या शेतक-यांना आवश्यक असलेल्या सर्व गरजा, सुविधा आणि आधारभुत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. महिलांना सशक्त करणारे ग्रामीण भागात नोकरीची संधी निर्माण करणारा हा प्रकल्प आहे. मत्स्य उत्पादकांना थंड मच्छीचे बाजारपेठ तयार करण्यासाठी आणि आइस्ड आणि गोठलेल्या मासेंच्या उत्पादनासाठी तयार होण्यासाठी मोबाईल व्हेंडींग वाहने, इंटीग्रेटेड मोबाईल फिश व्हेंटीन्सची निर्मिती करण्यासाठी स्वयंरोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प आहे. पोस्टहार्वेस्ट सुविधा जसे की आईस्कड फिश, प्रीप्रोसेंसिंग, फिश ड्रेसिंग आणि मूल्यवर्धित उत्पादनांचे आणि त्यानुरुप उत्पादकांसाठी आणि ग्राहकांना गुणवत्ता उत्पादनांची पूर्तता या प्रकल्पातून होणार आहे.
सदर प्रकल्प गतीमान करुन दर्जेदार करावा अश्या सुचना यावेळी दिल्या. हा प्रकल्प मंजुर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे उर्वरीत काम त्वरीत पूर्ण करुन हा प्रकल्प कार्यान्वित करावा. महानगरपालिकेचे सदर कार्य लोकांना रोजगार निर्माण करणारे असून यंत्रणेने सदर कार्य उत्कृष्टरित्या पूर्ण करावे. फिशरीज हब उभारण्याचे कार्य सुरु असून या ठिकाणी होलसेल व रिटेल फिश मार्केट तयार होत आहे. या ठिकाणी फिश ड्रेसिंग सेंटर, आईस प्लांन्ट, होलसेल शॉप ३०, रिटेल शॉप १०, चिल्ड रुम, आईस रुम तयार करण्याचे काम झाले आहे.



