२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने उत्साहात साजरा
अकोला : स्थानिक नाना मंगलम मंगल कार्यालय येथे इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, मोरारजी देसाई योग संस्थान, आयुष मंत्रालय भारत सरकार आणि गुड मॉर्निंग ग्रुप, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १०० हून अधिक योगसाधकांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन योग साधनेचा लाभ घेतला.
शिबिरात योगाचार्य डॉ. सुभाष लव्हाळे (इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे समन्वयक), गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, कर्ता हनुमान मंडळाचे अध्यक्ष व माजी सैनिक सुभाष पाटील म्हैसने, सौ. नंदाताई निचळ, डॉ. गजानन धरमकर, विलास आगरकर, सौ. प्रतिभाताई अवचार आणि श्रीमती लता वानखडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत योगाचे महत्त्व पटवून दिले.
शिबिरात योगाचे विविध प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी डॉ. अशोक ओळंबे यांनी योग दिन फक्त २१ जूनपुरता मर्यादित न ठेवता दररोज नियमित योग साधनेचे आवाहन केले. तर माजी सैनिक सुभाष पाटील म्हैसने यांनी, “गेल्या १७ वर्षांपासून कर्ता हनुमान मंडळातर्फे सातत्याने योग शिबिरे घेतली जात आहेत,” असे सांगितले.
विश्वकर्मा भवन येथे दररोज नियमित व मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सुभाष लव्हाळे यांनी केले.
कार्यक्रमात दिनकरराव घोडेराव, गजानन गोलाईत, अरुण मानकर, किशोर वडतकर, संतोष काटे, दत्ता भुसारी, प्रशांत बानोले, अॅड. संतोष गोळे, डॉ. राजेश वर्धेकर यांनी योग शिक्षक व शिक्षकांचे स्वागत करून त्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाला रेवत खाडे, अर्जुन जाधव, गोपाल दांडगे, विवेक यादगिरे, प्रवीण कदम, अॅड. प्रवीण सोनी, वसंत जायदे, राजेंद्र जोशी, ललिता तराळे, सुनंदा पुरी, हरीश गंगावते, गजानन माळी, शैलेंद्र सिसोदिया, हिम्मतराव पोहरे, महादेव खरसाळे, संजय वैद्य, लक्ष्मण मोरे, चिकटे काका, अनुराग आठवले, सुरेश वाडकर, मुरलीधर आवटे, चंद्रकांत ताठे, प्रल्हाद शेळके, शरद लवटे, प्रकाश कुलट, विलास वानखडे, भिकाजी भगत, अशोक भिलकर, मीरा ढोरे, निर्मला टेकाडे, सुमिती राऊत, रजनी पोहरे, विजुताई लव्हाळे, पंचफुला पाथरीकर, शीला मगर, किरण वादेकर, मनोरमा येवले, रेखा जयस्वाल, रामेश्वर राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.



