“अमरावती महापालिकेच्या संयुक्त उपक्रमातून योग दिवसाचे भव्य आयोजन”
अमरावती : २१ जून २०२५ रोजी अंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्धतेत साजरा करण्यात आला. अमरावती महानगरपालिका संचालित अहिल्या महिला आरोग्य समिती, शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी आणि अंकुर होलीनेस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तव्य सेलिब्रेशन लॉन, वलगाव रोड, नवसारी येथे सकाळी ६ ते ७ या वेळेत योग साधना शिबीर आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांचे देखील मार्गदर्शन लाभले.
- ठळक मुद्दे :
थीम: प्रत्येक घरात योग, दररोज योग - उद्देश: शारीरिक, मानसिक आणि आत्मिक समृद्धीसाठी योगाचा प्रचार
- प्रमुख उपस्थिती: आयुक्त सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, वैद्यकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर
- योगाची वैश्विक ओळख : भारतीय ज्ञान परंपरेचा जागतिक सन्मान
- सहभाग: नागरिक, अधिकारी, आशा वर्कर, महिलांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
आयुक्त सौम्या शर्मा यांचे विचार
“निरोगी शरीर हे प्रत्येक माणसासाठी मूलभूत गरज आहे. योग ही फक्त एक व्यायाम पद्धती नाही, तर ती संतुलित जीवन जगण्याची कला आहे. दररोज योगासने केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना योगाची सखोल जाणीव होणे आवश्यक आहे.”
उपस्थित मान्यवर व आयोजक मंडळी :
कार्यक्रमात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, समुपदेशक क्षिप्रा मानकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज मुंधडा, डॉ. फिरोज खान, अंकुर फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. निलीमा बुथ, माजी नगरसेविका मंजुषा महल्ले, क्रीडा अधिकारी प्रविण ठाकरे, डॉ. संदिप पाटबागे, सहा. प्रोग्रामर पंकज सपकाळ, पोलीस निलेश गाडे, तसेच महानगरपालिका व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- शिबिर यशस्वी करणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे :
संध्या पाटील (आशा वर्कर) - वैशाली सुरोसे (आरोग्य सेविका)
- सौ. प्रविणा आठवले, सौ. कल्पना वानखडे
- योग प्रशिक्षक निखात यास्मिन व प्रियंका गोवारे
- या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे योग शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.



