citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMumbai

डोंबिवलीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून १८२ अॅल्युमिनियम प्लेट्सची चोरी; पाच आरोपी अटकेत

विष्णुनगर पोलिसांची सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे कारवाई; ६ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून तब्बल १८२ अॅल्युमिनियम प्लेट्स चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पाच आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत चोरीच्या मुद्देमालापैकी ८७ अॅल्युमिनियम प्लेट्स हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्लेट्सची किंमत सुमारे ६ लाख ९१ हजार रुपये असल्याची माहिती आहे. चोरीसाठी वापरण्यात आलेला टेम्पोदेखील पोलिसांनी जप्त केला आहे.

या चोरीप्रकरणाचा छडा लावण्यासाठी विष्णुनगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानंतर पाच जणांना अटक करण्यात आली.

दरम्यान, चोरीला गेलेल्या उर्वरित अॅल्युमिनियम प्लेट्स हस्तगत करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणातील इतर फरार आरोपींचाही शोध घेतला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button