citynewslatestnewss politicalnewsMaharashtraPoliticsyawtmal

जनजातीय गौरव सेवा सप्ताहात भाजप राबविणार विविध उपक्रम; आमदार राजू तोडसाम यांची माहिती

११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन; आदिवासी संस्कृती, परंपरा आणि महापुरुषांच्या कार्याचा होणार गौरव

यवतमाळ, प्रतिनिधी : राज्य सरकारच्या वतीने ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आदिवासी समाजबांधवांसाठी विविध उपक्रम आणि सेवाभावी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजप आमदार राजू तोडसाम यांनी दिली.

जनजातीय गौरव सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, श्रद्धास्थाने तसेच समाजाच्या उत्थानासाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. यासोबतच आदिवासी बांधवांसाठी विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम राबवून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे तोडसाम यांनी स्पष्ट केले.

भाजपने खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाला विकासाच्या आणि मुख्य प्रवाहाच्या दिशेने आणण्याचे काम केले आहे. देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदी आदिवासी समाजातील व्यक्तीला संधी देऊन या समाजाचा सन्मान वाढविण्याचे काम भाजपने केले, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आदिवासी समाजाच्या विकासाच्या मुद्द्यावरून सकारात्मक भूमिका घेण्याऐवजी विरोधक वनवासी आणि आदिवासी असा निरर्थक वाद निर्माण करीत असल्याचा आरोपही आमदार राजू तोडसाम यांनी केला. जनजातीय गौरव सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा सांस्कृतिक वारसा आणि महापुरुषांचे योगदान समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button