
नामफलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण; स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान, गंगेले परिवाराच्या स्नेहमिलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती, दि. १२ : स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. अयोध्याप्रसाद गंगेले (गुरुजी) यांच्या कार्याची आणि स्मृतींची जपणूक करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या मंजुरीने एका मार्गाला त्यांचे नाव देण्यात आले. हिंदू स्मशानभूमी ते न्यू गणेश कॉलनीमार्गे शिवालय अपार्टमेंट, रविनगरपर्यंत जाणाऱ्या मार्गाला ‘स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. अयोध्याप्रसाद गंगेले (गुरुजी) मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी या मार्गाच्या नामफलकाचे मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक अनावरण करण्यात आले. यानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान तसेच गंगेले परिवाराच्या वतीने कौटुंबिक स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन ‘आशा निवास’ येथे करण्यात आले होते. नामफलकाचे अनावरण नगरसेविका तथा राजापेठ झोन सभापती स्वाती कुलकर्णी, नगरसेवक मिलिंद बांबल, रतन डेंडुले, नगरसेविका लविना हर्षे, प्रियंका पाटणे आणि स्वीकृत नगरसेवक अॅड. प्रशांतभाऊ देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा स्वाभिमान पार्टीचे कार्याध्यक्ष सुनील राणा, उपविभागीय अधिकारी (महसूल) अनिल भटकर, तहसीलदार संतोष कटारे, ग्राहक तक्रार निवारण मंच तथा महावितरण अमरावती मंडळाचे अध्यक्ष रमेश मावस्कर, भूषण पाटणे, चंद्रशेखर कुलकर्णी आणि विशाल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान
स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमात स्वातंत्र्यसंग्राम सेनानींच्या कुटुंबीयांचा विशेष सन्मान करण्यात आला. देवेंद्र कनाटे, माधवराव देशमुख, मनोहरराव देशमुख, हाजी सैयद अफजल आणि मंदा नरेंद्र अंबुलकर यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पंढरपुरी तुळशीचे रोप देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन श्याम शर्मा, जुगलकिशोर पटेरिया, अॅड. दिलीप तिवारी, किरण अग्रवाल, कीर्ती पांडे, मंगेश बारस्कर आणि महेंद्र गायकवाड यांनी स्वागत केले.
गंगेले परिवाराच्या स्नेहमिलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मार्गाच्या नामकरण सोहळ्यासोबतच गंगेले परिवाराच्या वतीने कौटुंबिक स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहमिलनात गणेश कॉलनीतील नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सेवानिवृत्त महसूल अधिकारी-कर्मचारी तसेच न्यू हायस्कूल मेन कट्टा ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गणेश कॉलनीतील मुकुंद बहाड, राजू बहाड, राजेश अग्रवाल, गजेंद्र दाभाडे, नंदकिशोर बनसोड, दिलीप सदार, ठाकरे काका, अनुप ठाकरे, सारिका ठाकरे, जयश्री बारस्कर, ज्योत्स्ना सदार, नितीन शाह, सोनम शाह, माधुरी जोशी, सारंग टोम्पे, विजय टोम्पे, पूजा टोम्पे, रवी मांडवेकर, प्रवीण केशरवाणी, राजू अडवाणीकर, प्रमोद धनागरे, अरुण मेन, गौरी केशरवानी, संतोष बजाज, सुचिता बजाज, अभय शालिग्राम आणि गोविंद मालू यांची उपस्थिती होती.
जिझौतिया ब्राह्मण समाज मंडळाच्या वतीने संतोष तिवारी, प्रकाश तिवारी, कुंदन पांडे, घनश्याम पांडे, दीपेंद्र मिश्रा, अरुण मिश्रा, महेंद्र तिवारी, पं. शुभम तिवारी, श्रीप्रसाद शर्मा, अनिता तिवारी, छाया शर्मा, दर्शन कौसकीय, दिनेश पटेरिया, रमेश पटेरिया, विजय पटेरिया आणि प्रतीक्षा पटेरिया सहभागी झाले होते.
सेवानिवृत्त महसूल मित्र मंडळ कट्टा ग्रुपचे विनोद शिरभाते, मनोहरराव कडू, प्रमोद सिंगलवार, साहेबराव तिडके, जनार्दनभाऊ माहोरे, पांडुरंग ढोक, नंदकिशोर काळे, महेंद्र गायकवाड, विजय महाजन, संजय हस्तक, केशवराव मळसणे, दीपक जरे, विजय भगत आणि पप्पू मिश्रा यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
न्यू हायस्कूल मेन कट्टा ग्रुपचे विजय हरवाणी, नंदकिशोर गुंबले, दिनेश देशमुख, राजेंद्र गुल्हाने, रमाकांत पीडियार, प्रदीप पोफळे, संजय सव्वालाखे, विनय तिवारी, मोहन बनसोड, मनोज देशमुख, अनिल आवलीनकर, अनिल जोशी, गजानन कोठेकर, नाना चौधरी, संजय बिजागरे, विलास खारकर आणि विवेक गोमेकर उपस्थित होते. तसेच जुगलकिशोर बालाजी संस्थानच्या वतीने संजय खरया आणि महेश गुप्ता यांनी उपस्थिती दर्शविली.
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. अयोध्याप्रसाद गंगेले गुरुजी यांच्या नावाने मार्गाचे नामकरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान हा केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची आणि त्यागाच्या परंपरेची आठवण करून देणारा ठरला. अशा उपक्रमांमधून स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्यांच्या स्मृती जतन करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश या सोहळ्याच्या माध्यमातून देण्यात आला.



