citynewsMaharashtraNagpurNagpurPolice

किल्ले कोलाड परिसरात सुरक्षा रक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; ४९ वर्षीय राजेश चौरे यांचा मृत्यू

उपचारासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले; दुसऱ्या दिवशी झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, खापरखेडा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

नागपूर, प्रतिनिधी : खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदा शिवारातील किल्ले कोलाड परिसरात एका ४९ वर्षीय सुरक्षा रक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजेश लक्ष्मण चौरे (वय ४९, रा. वॉर्ड क्रमांक ३, घोगली) असे मृताचे नाव आहे. ते कोराडी-महादुला येथील तायवाडे महाविद्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश चौरे हे मागील काही दिवसांपासून पोटदुखीच्या त्रासाने ग्रस्त होते. बुधवारी (दि. ११) रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास उपचारासाठी जात असल्याचे कुटुंबीयांना सांगून ते दुचाकीने घराबाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत.

दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास नांदा शिवारातील किल्ले कोलाड परिसरात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह नागरिकांना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी खापरखेडा पोलिसांना कळविले.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाटनसावंगी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

राजेश चौरे यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या प्रकरणाचा पुढील तपास खापरखेडा पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button