रामटेकच्या प्राचीन राम मंदिरात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे सहकुटुंब दर्शन!

११ व्या शतकातील मंदिराची अप्रतिम वास्तुकला अन् भोसले राजघराण्याने केलेला जीर्णोद्धार पाहून भारावले; प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामातेचे घेतले दर्शन
रामटेक | प्रतिनिधी : अजय मेहरकुळे
नागपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक रामटेक येथील प्राचीन श्रीराम मंदिराला पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सहपरिवार भेट देत प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराची प्राचीन वास्तुकला, ऐतिहासिक वारसा आणि आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेत त्यांनी समाधान व्यक्त केले.

मंदिर भेटीदरम्यान माध्यमांशी संवाद साधताना विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, ११ व्या शतकातील या मंदिराची अप्रतिम वास्तुरचना मनाला भावणारी आहे. मंदिरातील कलाकुसर, स्थापत्यशैली आणि भोसले राजघराण्याने केलेले संवर्धन व जीर्णोद्धार हे विशेष उल्लेखनीय आहेत. या ऐतिहासिक वास्तूचा समृद्ध वारसा पाहून मन प्रसन्न झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामातेचे दर्शन घेतल्यानंतर मनाला असीम समाधान लाभले. ऐतिहासिक वास्तुकला आणि आध्यात्मिक ऊर्जेचा सुंदर संगम असलेल्या या मंदिराचे महत्त्व प्रत्येकाने जाणून घ्यावे आणि आवर्जून दर्शन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी त्यांनी मंदिर परिसरातील ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक परंपरेबद्दलही समाधान व्यक्त केले. त्यांच्या या सहकुटुंब भेटीमुळे रामटेकच्या प्राचीन राम मंदिराचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
बाईट : विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त
सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी अजय मेहरकुळे, रामटेक.



