AmravaticitynewsLatest NewsMaharashtraMaharashtra Politicspolitics

शिक्षक मतदारसंघात अदिती पोहरे यांना पहिल्या पसंतीचे मत द्या! यशोमती ठाकूर यांचे आवाहन

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनार्थ माजी पालकमंत्र्यांचे आवाहन

अमरावती | सिटी न्यूज

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार प्राध्यापक अदिती ऋषिकेश पोहरे यांना पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

शिक्षक असलेल्या प्रा. अदिती पोहरे यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असून, त्यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करण्यासाठी शिक्षक मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले.

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग आला आहे. आपल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ नेते शिक्षक मतदारांशी संवाद साधत असून, मतदानाचे आवाहन करीत आहेत.

सिटी न्यूज | अमरावती

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button