citynewsCrime NewsMaharashtraNagpurNagpurCrime

आधी ATM फोडी… मग ATM स्कॅम!

आता थेट बँकेच्या गेटचं लॉक तोडलं; आठवा मैल परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

नागपूर : नागपुरात एटीएम फोडी आणि एटीएम स्कॅमच्या घटनांनंतर आता थेट बँकेच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. आठवा मैल परिसरातील बँक ऑफ इंडियाच्या गेटचे लॉक अज्ञात व्यक्तींनी तोडल्याचे समोर आले आहे.

गेटचे लॉक तोडतानाची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.

विशेष म्हणजे, याच परिसरात गेल्या काही दिवसांत किराणा दुकान आणि मेडिकलमध्येही चोरीच्या घटना घडल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील सलग चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बँकेच्या प्रवेशद्वाराचे लॉक तोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेल्याने बँक आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनांमागे एकच टोळी आहे का, तसेच बँकेच्या गेटचे लॉक नेमके कोणत्या उद्देशाने तोडण्यात आले, याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांवर पोलिसांनी कठोर कारवाई करून परिसरातील नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button