citynewsNagpur

“मुंगेरीलाल के हसीन सपने…”; भाजपच्या आरोपांवर अभिजित वंजारींचा पलटवार

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदारांची Exclusive मुलाखत; सहा वर्षांच्या कामाचा लेखाजोखा आणि आगामी निवडणुकीवर भाष्य

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची २०२६ची निवडणूक २३ ऑक्टोबर रोजी होणार असून, विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांचा कार्यकाळ संपत असल्याने पुन्हा निवडणुकीची रंगत वाढली आहे. २०२०मध्ये भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव करून वंजारी यांनी विजय मिळवला होता. यावेळी भाजपकडून त्यांच्या कार्यकाळावर आणि विविध मुद्द्यांवर आरोप केले जात असताना, अभिजित वंजारी यांनी City Newsला दिलेल्या Exclusive मुलाखतीत या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. २०२०मध्ये भाजपच्या पारंपरिक प्रभावाच्या मतदारसंघात विजय मिळवत अभिजित वंजारी विधान परिषदेत पोहोचले. २०२०च्या निवडणुकीत वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा १८ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

आता सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर वंजारी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात आहेत. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कामाचा लेखाजोखा, विरोधकांकडून होणारे आरोप आणि आगामी निवडणुकीतील मुद्दे चर्चेत आले आहेत.

भाजपकडून करण्यात येणाऱ्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अभिजित वंजारी यांनी आरोपांचे खंडन केले. विरोधकांच्या दाव्यांवर “मुंगेरीलाल के हसीन सपने…” असा टोला लगावत त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्या मते, विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या दाव्यांपेक्षा प्रत्यक्ष काम आणि मतदारांशी असलेला संवाद महत्त्वाचा आहे.

दरम्यान, वंजारी यांच्या कार्यकाळातील कामगिरीवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांनाही त्यांनी मुलाखतीत उत्तर दिले. पदवीधर मतदारांच्या प्रश्नांसोबतच शिक्षण, रोजगार, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मतदारसंघातील विविध विषयांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवाराच्या निवडीचीही चर्चा सुरू आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघावर भाजपचे अनेक दशकांचे वर्चस्व राहिले असले, तरी २०२०मध्ये हे समीकरण बदलले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वंजारी यांच्यासमोर कोणते आव्हान असेल आणि भाजपच्या आरोपांना ते कशा पद्धतीने उत्तर देतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

२०२०चा ऐतिहासिक विजय, सहा वर्षांचा कार्यकाळ, भाजपचे आरोप, “मुंगेरीलाल के हसीन सपने…” या वक्तव्याचा संदर्भ आणि आगामी पदवीधर निवडणुकीबाबत अभिजित वंजारी यांची भूमिका जाणून घेण्यासाठी पाहा त्यांची सविस्तर Exclusive मुलाखत — फक्त City News वर.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button