citynewsLatest NewsMaharashtraNagpur

महाराजबाग Zoo ला 5.55 कोटींचा महसूल; तरीही जुन्या पिंजऱ्यांची दुरवस्था का?

RTI मधून धक्कादायक आकडे समोर; देखभाल, सुरक्षा आणि Redevelopment वर खर्च किती? नागरिकांचा प्रशासनाला सवाल

नागपूर | City News विशेष रिपोर्ट

नागपूरच्या महाराजबाग Zoo च्या महसुलाबाबत RTI मधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 2022 ते 2026 या कालावधीत महाराजबाग Zoo ला तब्बल 5 कोटी 55 लाख रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या महसुलाच्या तुलनेत Zoo मधील जुन्या पिंजऱ्यांची अवस्था, देखभाल, सुरक्षा व्यवस्था आणि पायाभूत सुविधांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे, मार्च 2026 मध्ये Zoo प्रशासनाकडूनही जीर्ण पिंजरे, मनुष्यबळाची कमतरता आणि सुरक्षेच्या उपाययोजनांशी संबंधित मुद्दे समोर आले होते. त्यामुळे आता 5 कोटी 55 लाख रुपयांच्या महसुलातून प्रत्यक्षात Zoo ची देखभाल, पिंजऱ्यांची दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था आणि Redevelopment साठी किती निधी खर्च करण्यात आला, याची अधिकृत माहिती प्रशासनाने नागरिकांसमोर ठेवावी, अशी मागणी होत आहे.

महाराजबाग Zoo हे केवळ पर्यटनस्थळ नाही, तर येथे असलेल्या वन्यप्राण्यांची तसेच दररोज भेट देणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे महसुलाच्या आकड्यांसोबतच त्याचा वापर नेमका कुठे आणि किती करण्यात आला, हा प्रश्न आता चर्चेत आला आहे.

5 कोटी 55 लाखांचा महसूल मिळाला, मग देखभाल आणि सुरक्षेवर किती खर्च झाला? पिंजऱ्यांच्या दुरुस्तीवर किती निधी खर्च करण्यात आला? Redevelopment साठी किती तरतूद झाली?

या सर्व प्रश्नांची अधिकृत आणि पारदर्शक माहिती प्रशासनाने नागरिकांसमोर मांडण्याची मागणी होत आहे.

नेमका महसूल किती आणि खर्च किती? महाराजबाग Zoo च्या कारभारावर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांचा सविस्तर आढावा पाहा, City News चा हा विशेष रिपोर्ट.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button