citynewsLatest NewsMaharashtraNagpur

गोविंदराव वंजारी कॉलेजमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत!

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला; चितारोली परिसर झाला गणेशमय

नागपूर | City News

नागपूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला असून, स्वर्गीय गोविंदराव वंजारी कॉलेजमध्येही गणपती बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष पाहायला मिळाला. ढोल-ताशांचा गजर, बाप्पाच्या जयघोषाने दुमदुमलेले वातावरण आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे कॉलेज परिसर भक्तिमय झाला.

नागपूरच्या चितारोली परिसरात सकाळपासूनच गणपती बाप्पाच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले होते. स्वर्गीय गोविंदराव वंजारी कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच कॉलेज कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने बाप्पाच्या स्वागतासाठी एकत्र आले होते.

ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहाच्या वातावरणात गणरायाला कॉलेजमध्ये नेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात बाप्पाचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि गणरायाच्या आगमनाचा उत्साह स्पष्टपणे पाहायला मिळत होता.

गणेशोत्सवाच्या या उत्साहात कॉलेजमधील विद्यार्थी आणि कमिटीचे सदस्यही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. बाप्पाच्या आगमनावेळी परिसरात गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.

दरम्यान, City Newsने विद्यार्थ्यांसह कॉलेज कमिटीच्या सदस्यांशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या तयारीबाबत तसेच गणरायाच्या आगमनाबाबत खास माहिती जाणून घेतली.

भक्ती, उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात स्वर्गीय गोविंदराव वंजारी कॉलेजमध्ये गणरायाचे आगमन झाले. विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे कॉलेज परिसरातील गणेशोत्सवाची रंगत आणखी वाढली असून, तरुणाईच्या उत्साहात गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले.

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button