citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurPolice

अंबाझरी तलावात १६ वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न

सरावासाठी आलेल्या जलतरणपटूंच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव; घरातून निघण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती

नागपूर : नागपूरच्या अंबाझरी तलावात एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीने उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. मात्र, तलावात जलतरणाच्या सरावासाठी आलेल्या तरुणांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने पाण्यात उतरून तरुणीला बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला.

निशिता भीमराव सोनवणे, असे या तरुणीचे नाव असून ती धरमपेठ परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

घरातून निघण्यापूर्वी चिठ्ठी

मिळालेल्या माहितीनुसार, निशिता रात्री घरातून बाहेर पडण्यापूर्वी मी स्वेच्छेने माझं आयुष्य संपवत आहे, अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवली होती. घरात ही चिठ्ठी आढळल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी रात्रीच सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांकडून तिचा शोध सुरू करण्यात आला.

अंबाझरी तलावात उडी

दरम्यान, सकाळी अंबाझरी तलावात जलतरणाच्या सरावासाठी आलेल्या काही तरुणांच्या निदर्शनास एक तरुणी पाण्यात पडल्याचे आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी कोणताही विलंब न करता पाण्यात उतरून तरुणीला बाहेर काढले.

तरुणांच्या या तत्परतेमुळे निशिताचा जीव वाचला. त्यानंतर तिला आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान, अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिच्या कुटुंबीयांशी तसेच संबंधित व्यक्तींशी पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.

अंबाझरी तलावात जलतरणाच्या सरावासाठी आलेल्या तरुणांच्या प्रसंगावधानामुळे एका अल्पवयीन मुलीचा जीव वाचला. त्यांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बाईट : सुहास राऊत – पोलीस निरीक्षक, अंबाझरी पोलीस स्टेशन
बाईट : ईशान पांडे – जलतरण विद्यार्थी

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button