citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात गोवंश चोरीचा प्रकार उघड; कत्तलीपूर्वी गायीची सुटका

यशोधरा नगर पोलिसांची कारवाई; तिघे आरोपी ताब्यात, कारसह ५ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त

नागपूर | प्रतिनिधी

नागपुरात गोवंश चोरी करून कत्तलीसाठी आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यशोधरा नगर पोलिसांच्या डीबी पथकाने कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, कत्तलीपूर्वीच एका गायीची सुटका करण्यात आली आहे.

यशोधरा नगर पोलिसांच्या डीबी पथकाला संगम नगर परिसरातील पिवळी नदी नाल्याच्या काठावर एका गायीला कत्तलीसाठी आणल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी पंच आणि कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी दोन आरोपी गायीला बांधून ठेवून पुढील कारवाईची तयारी करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. चौकशीदरम्यान समीर अहमद कुरैशी आणि शेख शाहरुख यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गाय चोरी करून कारमधून आणल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणात अहफाज अहमद उर्फ सोबी, समीर अहमद कुरैशी आणि शेख शाहरुख या तिघांना आरोपी करण्यात आले आहे.

पोलिसांनी कारवाईदरम्यान एक गाय, हुंडई कार, धारदार छुरी आणि दोन मोबाईल असा एकूण ५ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी बजाज नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. गोवंश चोरीच्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button