BreakingNewscitynewsLatest News

रामटेकमध्ये प्रथमच दुर्मिळ पांढरा नानेटी अल्बिनो साप आढळला

बिनविषारी सापाचे सुखरूप रेस्क्यू; सर्पमित्रांमध्ये उत्सुकता

नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये प्रथमच दुर्मिळ पांढऱ्या रंगाचा बिनविषारी नानेटी अल्बिनो साप आढळून आला आहे. या अनोख्या सापामुळे परिसरातील नागरिकांसह सर्पमित्रांमध्येही उत्सुकता निर्माण झाली. माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत या सापाचे कोणतीही इजा न पोहोचवता सुखरूप रेस्क्यू केले आहे.

रामटेक शहर परिसरात दुर्मिळ पांढऱ्या रंगाचा नानेटी अल्बिनो साप आढळून आल्याने परिसरात चर्चा सुरू झाली.

या सापाची माहिती मिळताच वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन रामटेकचे सर्पमित्र आणि प्राणीमित्र तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

सर्पमित्रांनी मोठ्या काळजीपूर्वक आणि कौशल्याने या सापाला ताब्यात घेतलं. सापाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत त्याचं सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आलं.

शरीरातील रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे या सापाचा रंग नेहमीच्या नानेटी सापापेक्षा वेगळा आणि पांढरा दिसून येतो. त्यामुळे या सापाला अल्बिनो नानेटी म्हणून ओळखलं जात आहे.

रामटेक तालुक्यात अशा प्रकारचा दुर्मिळ पांढरा नानेटी साप प्रथमच आढळून आल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. त्यामुळे या रेस्क्यूमुळे सर्पमित्रांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

रेस्क्यू केलेल्या या सापाला लवकरच त्याच्या सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

दरम्यान, नागरिकांनी परिसरात साप आढळल्यास घाबरून जाऊ नये किंवा सापाला मारण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी प्रशिक्षित सर्पमित्रांना माहिती देऊन सापाचे सुरक्षित रेस्क्यू करण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

दुर्मिळ आणि पांढऱ्या रंगाचा असला तरी हा नानेटी साप बिनविषारी आहे. त्यामुळे साप दिसला की भीतीपोटी त्याला मारण्याऐवजी सर्पमित्रांची मदत घेणं गरजेचं आहे. वन्यजीवांचं संरक्षण करताना नागरिकांनी सतर्कतेसोबतच संवेदनशीलताही दाखवावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button