AmravatiBreakingNewscitynewsMaharashtraNews

अमरावतीत आरोग्य आणि जनजागृतीचा उत्साह; भव्य वॉकेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पंचवटी चौकातील शारीरिक शिक्षण मैदानातून वॉकेथॉनला सुरुवात; विजेत्यांवर रोख पुरस्कारांचा वर्षाव, लकी ड्रॉने वाढवला सहभागींचा उत्साह

अमरावती : शहरात आरोग्य, फिटनेस आणि जनजागृतीचा संदेश देणारी भव्य वॉकेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने पंचवटी चौक परिसरातील शारीरिक शिक्षण मैदानातून या वॉकेथॉन पदयात्रा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवत स्पर्धेला उत्साहात सुरुवात करण्यात आली.

या वॉकेथॉनच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीबाबत जनजागृती करण्यासोबतच नियमित व्यायाम आणि सक्रिय जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वॉकेथॉनच्या शुभारंभप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आरडीसी संतोष काकडे, तसेच ज्ञानेश्वर घ्यार, विकास खंडारे पाटील, दिलीप निपाणी, सुनील जाधव, श्रीकांत उमप आणि गावंडे सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली.

स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कुमारी तनुजा मेश्राम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना 25 हजार रुपयांचा रोख पुरस्कार देण्यात आला. कुमारी कस्तुरी बहुरूपी यांनी द्वितीय क्रमांक मिळवत 15 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. तर आयुष मुंडे यांनी तृतीय क्रमांक मिळवत 10 हजार रुपयांचा रोख पुरस्कार मिळवला.

याशिवाय उत्कृष्ट सहभागासाठी सहभागी स्पर्धकांना प्रत्येकी 3 हजार रुपयांचे प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले. अविनाश सावरकर, प्रचिती पाटील, खुशी ननखार, विजय केनोई, आचल वानखडे, अंजू कासदेकर आणि राजू मुंडे यांच्यासह इतर सहभागी या पुरस्काराचे मानकरी ठरले.

स्पर्धेदरम्यान लकी ड्रॉचेही आयोजन करण्यात आले होते. लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्यांची घोषणा करण्यात आल्याने सहभागींच्या उत्साहात आणखी भर पडली. आरोग्याचा संदेश, स्पर्धेचा उत्साह आणि पुरस्कारांची आकर्षक संधी यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

ही वॉकेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागातील सर्व उपअभियंते, कनिष्ठ अभियंते, अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग, अमरावतीच्या कर्मचारीवृंदाने विशेष परिश्रम घेतले.

आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारी ही वॉकेथॉन केवळ एक स्पर्धा न ठरता अमरावतीकरांमध्ये फिटनेस आणि जनजागृतीची भावना निर्माण करणारा उपक्रम ठरली.

अमरावतीतून सिटी न्यूजसाठी विशेष रिपोर्ट.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button