Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur graminNagpurPolice

धापेवाडा परिसरात भरधाव कार पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

सावनेर–कळमेश्वर मार्गावरील अपघात; वाहनाचे नुकसान, सर्व प्रवासी सुरक्षित

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात धापेवाडा परिसरात भरधाव कार अनियंत्रित होऊन रस्त्यालगत पलटी झाल्याची घटना घडली. अपघाताचे स्वरूप गंभीर असले तरी सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी अथवा गंभीर दुखापत झालेली नाही.

ही घटना सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धापेवाडा परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-४८-सीके-१०८३ क्रमांकाची कार सावनेरहून कळमेश्वरच्या दिशेने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यालगत पलटी झाली.

अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तातडीने सावनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

अपघाताचे दृश्य भीषण असले तरी कारमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले. या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती.

पावसाळ्यात रस्ते निसरडे होत असल्याने वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे, सुरक्षित अंतर राखणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button