AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

नाजिया इलाही खान यांच्याविरोधात कारवाईची मागणी; राजवीर जनहित संघटनेचे निवेदन

जिलाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती येथे राजवीर जनहित संघटनेच्या वतीने नाजिया इलाही खान यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जिलाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदन सादर करून संघटनेने कथित आक्षेपार्ह वक्तव्याबाबत गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नाजिया इलाही खान यांनी नबींबाबत कथितरीत्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणात तातडीने गुन्हा नोंदवून कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संघटनेने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. तसेच संबंधितांवर लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, मागण्यांवर त्वरित कार्यवाही न झाल्यास अमरावतीसह विदर्भ आणि राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. निवेदन सादर करताना संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रकरणावर संबंधित व्यक्ती किंवा प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. निवेदनानंतर प्रशासन आणि राज्य सरकार कोणती भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button