Amaravti GramincitynewsDharniLatest NewsMaharashtra

धारणीत मृतदेह आढळल्याने खळबळ; सावनेरमध्ये युवकाची आत्महत्या, दोन घटनांनी परिसर हादरला

धारणी तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कलमखार गावाजवळील गौलखेडा येथील एका व्यक्तीचा मृतदेह साद्राबाडी रोडवरील बोबदो गावाजवळ आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मृत्यूचे नेमके कारण काय याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट.

धारणी तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस सर्व शक्यता तपासत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे.

धारणी तालुक्यातील गौलखेडा येथील रहिवासी सुरेश छगन जांभेकर वय चौतीस वर्षे यांचा मृतदेह साद्राबाडी रोडवरील बोबदो गावाजवळ आढळून आला.


घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मृतदेह आढळल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार मृतदेह ज्या परिस्थितीत आढळून आला त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत

.
दरम्यान या प्रकरणात अपघात झाला की अन्य काही कारण आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा आणि आवश्यक तपास प्रक्रिया सुरू केली.मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी पोलिस विविध अंगांनी तपास करीत आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नसल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.


दरम्यान या घटनेमुळे कलमखार, गौलखेडा आणि आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत्यूमागील नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

सावनेर तालुक्यातील टेबूरडोह येथे राहणारे दादाराव मधुकरजी रंगारी वय 37 वर्षे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी सुमारे सहा वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. ही घटना खापा पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तात्काळ खापा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर भुजाडे यांना याबाबत कळविले.


माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा आणि इतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर संबंधितास मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून खापा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे टेबूरडोह गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button