Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraYavatmal

पुसदजवळ भीषण अपघात; होमगार्ड जवानासह दोघांचा जागीच मृत्यू, महिला गंभीर जखमी

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहराजवळ आज एक भीषण अपघात घडला आहे. मालवाहू टिप्पर आणि दोन दुचाकींच्या जोरदार धडकेत होमगार्ड जवानासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पुसद शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या इंदिरानगर परिसरातील नगरपालिकेच्या कचरा संकलन केंद्राजवळ हा भीषण अपघात घडला.

मालवाहू टिप्पर आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये गणेश विष्णू जाधव यांचा समावेश असून ते होमगार्ड जवान असल्याची माहिती समोर आली आहे. ते काटखेडा येथील रहिवासी होते. दुसऱ्या मृतकाचे नाव अरविंद राठोड असे आहे.

या भीषण अपघातात अनिता राठोड या महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला.

सध्या अपघाताचे नेमके कारण समोर आले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पुसदमधील या भीषण अपघातामुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button