Accident NewscitynewsIndia NewsLatest News

आंध्र प्रदेशात भीषण अपघात; रुग्णवाहिका उभी ट्रकवर आदळली, चौघांचा जागीच मृत्यू

श्रीकालहस्ती (तिरुपती) : आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात सोमवारी पहाटे भीषण अपघात घडला. श्रीकालहस्ती जवळ उभी असलेल्या ट्रकवर रुग्णवाहिका मागून जोरात आदळल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले.

हा अपघात तिरुपती–नायडुपेटा राष्ट्रीय महामार्गावरील उरंदूर (उरंडूर) परिसरात घडला. अपघातावेळी रुग्णवाहिका कोलकात्यातून एका रुग्णाला घेऊन बंगळुरूकडे जात होती. याच दरम्यान महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला रुग्णवाहिकेने मागून जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत रुग्णवाहिकेतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये रुग्णवाहिकेचा चालकही असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात जखमी झालेल्या दोघांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच श्रीकालहस्ती ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, तिरुपती जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात अलीकडेच ४८ अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ ओळखण्यात आले असून, प्रशासनाने त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button