AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

बडनेरात आंबेडकर जयंतीची जोरदार तयारी; समता चौकात उत्साहाची लगबग

बडनेरा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बडनेरातील समता चौकात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यंदाची जयंती विशेष आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यासाठी डॉ. आंबेडकर पुतळा स्मारक समितीकडून जोरदार तयारी सुरू आहे.

सध्या समता चौक परिसरात स्वच्छता, रंगरंगोटी आणि आकर्षक सजावटीची कामे वेगाने सुरू आहेत. ठिकठिकाणी मोठे होर्डिंग्स आणि बॅनर्स लावण्यात येत असून, संपूर्ण परिसर उजळून निघत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती आगळीवेगळी साजरी करण्याचा समितीचा प्रयत्न असून, नागरिकांमध्येही उत्साहाची लाट उसळली आहे.

यंदाच्या जयंतीनिमित्त २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सत्यपाल महाराजांचे शिष्य आणि राष्ट्रीय समाज प्रबोधनकार पवन महाराज दवंडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या जयंती उत्सवासाठी समितीचे अध्यक्ष मनोज गजभिये, सचिव सिद्धार्थ बनसोड तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. हा सोहळा भव्य आणि संस्मरणीय करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.

यंदा बडनेरातील आंबेडकर जयंती विशेष ठरणार असून, समता चौकात सजावट, कार्यक्रम आणि उत्साहाची लगबग सुरूच आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button