Crime NewsLatest NewsNagpur

वर्दी सर्वप्रथम! जखमी अवस्थेतही बीट मार्शलने आरोपी पकडला

नागपूरच्या पांचपावली पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. बीट मार्शल आनंद सिंह हे नियमित गस्त घालत असताना राणी दुर्गावती चौकाजवळ एका ट्रकच्या मागे अंधारात बसलेले तीन युवक त्यांना दिसले… संशय आल्याने त्यांनी त्या युवकांना विचारणा केली. मात्र पोलिसांची चाहूल लागताच दोन युवकांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान तिसऱ्या युवकाला पकडण्याचा प्रयत्न सुरू असताना त्याने अचानक विट उचलून बीट मार्शल आनंद सिंह यांच्या दिशेने फेकली.
या हल्ल्यात आनंद सिंह जखमी झाले, पण इथेच खरी गोष्ट घडली जखमी असूनही त्यांनी धाडस दाखवत आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.
यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एक आरोपीला अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात शासकीय कामात अडथळा आणि हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांवर हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे… मात्र जखमी अवस्थेतही धाडस दाखवणाऱ्या बीट मार्शलच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button